स्मरण चित्र – पावसाळा

          विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्मरण चित्र या घटक विषयात पावसाला हा विषय घेऊन चित्र बनवणार आहोत.

स्मरणचित्र म्हणजे काय ? व स्मरण चित्र रेखाटताना कोणते मुद्दे लक्षात घ्यावेत ते बघू .

स्मरणचित्र म्हणजे काय ?

 

          प्रत्यक्ष घडलेले प्रसंग व अनुभवलेले क्षण स्मरणात असतात. ते आठवून त्यातील महत्त्वाच्या भागांचे चित्रण केले जाते. स्मरणाने काढलेल्या चित्रास ‘स्मरणचित्र’ असे म्हणतात.

स्मरणचित्राची काही उदाहरणे फुगेवाला, पतंग उडवणारी मुले, स्वच्छता करणारी मुले मुली, सण समारंभावर आधारित स्मरणचित्र.

स्मरणचित्राचे रेखाटन करताना लक्षात घेण्याचे मुद्दे

  1. स्मरणचित्र रेखाटन करते वेळी प्रमुख व गौण आकार ठरवून त्यानुसार रेखाटन करावे.
  2. चित्रातील विषयानुसार प्रमुख घटकाला महत्त्व देऊन इतर घटकांचे रेखाटन करावे.
  3. चित्रातील पार्श्वभूमी व घटक यांची नीट रचना केल्यास चित्राचा कोणताही भाग रिकामा वाटत नाही.
  4. चित्र काढण्यापूर्वी चित्रातील घटकांची प्रथम मांडणी करून मगच पक्के रेखाटन करावे. 
  5. रेखाटनात वास्तवता व प्रमाणबद्धता असावी लागते.

 

MEMORY-DRAWING-RAIN
MEMORY DRAWING – RAIN

 

 

पावसाळ्यातील आपल्या स्मरणातील प्रसंगाचे चित्र कसे तयार करावे याचे प्रात्यक्षिक आपण खाली दिलेल्या VIDEO त बघू शकतात. व्हिडीओ लक्षपूर्वक बघून आपल्या चित्रात वातावरण निर्मिती करा.