घटक – कोलाज चित्र ( MARATHI )

इयत्ता – सातवी
चित्राचा विषय – कोणत्याही एका फळाचे कोलाज चित्र तयार करा. ( सोबत फळाचा कापलेला भाग )

College-Work-Fruit
कोलाज चित्र

कोलाज चित्र किंवा कोलाज कला दृक ( दृश्य ) कलेतील एक महत्वाची कला आहे. कोलाज चित्रात कलाकाराला सृजनशीलतेस ( नवनिर्मितीस ) भरपूर संधी असते. कोलाज हा शब्द फ्रेंच भाषेतून आला आहे. याचा अर्थ ‘चिटकवणे’ असा होतो. 

कोलाज चित्र तयार करताना किंवा फाडलेले पेपर चिटकवताना 

  • चित्राचा विषय
  • आकारांची रचना 
  • रंग संयोजन 
  • वातारण निर्मिती
  • इत्यादी बाबी महत्वपूर्ण असतात.

कोलाज चित्रात मासिकचे रंगीत पाने, टेक्स्ट पेपर, रिबन, अथवा उपलब्ध वस्तूंचा वापर करू शकतो. 

विद्यार्थी मित्रांनो आज आपण कोणत्याही एका फळाचे कोलाज चित्र तयार करणार आहोत. ( सोबत फळाचा कापलेला भाग किंवा फोडी .)

👇 खाली दिलेल्या व्हिडिओ चा अभ्यास करून कोलाज चित्र तयार करा. 👇


नमुना चित्र 👇
College-Work-Fruit
कोलाज चित्र – कलिंगड