घटक – कोलाज चित्र ( MARATHI )
इयत्ता – सातवी
चित्राचा विषय – कोणत्याही एका फळाचे कोलाज चित्र तयार करा. ( सोबत फळाचा कापलेला भाग )
कोलाज चित्र |
कोलाज चित्र किंवा कोलाज कला दृक ( दृश्य ) कलेतील एक महत्वाची कला आहे. कोलाज चित्रात कलाकाराला सृजनशीलतेस ( नवनिर्मितीस ) भरपूर संधी असते. कोलाज हा शब्द फ्रेंच भाषेतून आला आहे. याचा अर्थ ‘चिटकवणे’ असा होतो.
कोलाज चित्र तयार करताना किंवा फाडलेले पेपर चिटकवताना
- चित्राचा विषय
- आकारांची रचना
- रंग संयोजन
- वातारण निर्मिती
- इत्यादी बाबी महत्वपूर्ण असतात.
कोलाज चित्रात मासिकचे रंगीत पाने, टेक्स्ट पेपर, रिबन, अथवा उपलब्ध वस्तूंचा वापर करू शकतो.
विद्यार्थी मित्रांनो आज आपण कोणत्याही एका फळाचे कोलाज चित्र तयार करणार आहोत. ( सोबत फळाचा कापलेला भाग किंवा फोडी .)
👇 खाली दिलेल्या व्हिडिओ चा अभ्यास करून कोलाज चित्र तयार करा. 👇
नमुना चित्र 👇