CLASS 7th
poster making header

विषय -: चित्रकला 

घटक -: पोस्टर ( भित्तिचित्र ) Poster Drawing
उप-घटक -: हात धुआ, पाणी वाचवा, पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण अशा समाज प्रबोधनपर विषयांवर चित्र काढणे.

जेव्हा आपण एखाद्या सामाजिक विषयावर चित्राच्या माध्यमातून संदेश देऊन जनजागृती करतो, त्यात आपण चित्रासोबत संदेशही लिहितो अशा प्रकारच्या चित्राला भित्तिचित्र म्हणजेच पोस्टर ड्रॉईंग Poster Drawing असे म्हणतो.आज आपण अशाच प्रकारचा एक सामाजिक विषय घेऊन त्याचे भित्तिचित्र तयार करणार आहोत. त्याच्याआधी पोस्टर ड्रॉईंग किंवा भित्तिचित्र नेमके काय असते ते समजून घ्या व निरीक्षणासाठी दिले काही ही पोस्टर ड्रॉईंग चा अभ्यास करून स्व कल्पनेने एक पोस्टर तयार करा. 

पोस्टर ( भित्तिचित्र ) Poster Drawing काय असते ?

पोस्टर म्हणजे भित्तिचित्राच्या माध्यमातून एखादा संदेश देणे, जाहिरात करणे किंवा घोषणा देणे.

एक चांगले पोस्टर किंवा भित्तिचित्र येणाऱ्या-जाणाऱ्या चे लक्ष वेधून घेते.

पोस्टर चा उपयोग संदेश देणे किंवा भावना ( उदा. देशभक्ती ) प्रबळ करणे.

पोस्टर तयार करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे

  • चित्रे, आकार, रेखांकन – पोस्टर करता वापरण्यात येणारे निवडक चित्रे किंवा आकार यांचे वेगवेगळ्या पद्धतीने स्केचेस करून निवडक व प्रभावी आकार किंवा चित्रांची निवड करून पोस्टरमध्ये वापरावीत. 
  • आकर्षक रचना – भित्तिचित्र तयार करताना आकारांची ची किंवा चित्राची रचना संतुलित व आकर्षक असणे गरजेचे असते.
  • शीर्षक घोषवाक्य किंवा घोषणा –  जर भित्तिचित्र तयार करण्यासाठी आपण शीर्षक निवडले तर ते  कमी शब्दात असणे गरजेचे आहे. तसेच भित्तिचित्रातील घोषवाक्य म्हणजेच स्लोगन हे कमी शब्दात जास्त अर्थपूर्ण असणे आवश्यक आहे
  • संदेश – भित्तिचित्राच्या माध्यमातून देण्यात येणारा थोडक्यात, मनाला भिडणारा असावा..
  • चिन्ह, लोगो, सिम्बॉल – भित्तिचित्र तयार करताना सांकेतिक चिन्ह, लोगो किंवा सिम्बॉल वापरल्यास पोस्टर पटकन समजते किंवा पोस्टर कोणामार्फत आहे ते समजते.

👇 नमुना चित्रे 👇

how-to-make-poster
Poster Making fig 1

ad

how-to-make-poster
Poster Making fig 2