memory-drawing-rain
स्मरण चित्र

विद्यार्थी मित्रांनो,

 

भारतातील ऋतू चक्रानुसार भारतात आपण हिवाळा, उन्हाळा व पावसाळा असे तीन ऋतू अनुभवतो पैकी उन्हाळ्यात उकाड्यात हैराण होऊन आपण पावसाची आतुरतेने वाट बघतो. अशा पद्धतीने पहिल्या पावसाने मन प्रसन्न होते. पावसात आपण नाचतो, खेळतो, उड्या मारतो, कागदाची होडी बनवतो. असे अनेक प्रसंग, गमती-जमती पावसात आपण करतो. तर आशाच एखाद्या पावसातील प्रसंगाचे चित्रण आज स्मरण चित्रात करायचे आहे.

 

स्मरण चित्र तयार करत असताना खाली काही गोष्टी लक्षात असू द्या.

  • चित्र तयार करत असताना चित्राच्या विषयाला प्राधान्य द्या
  • चित्रात किमान तीन ते चार मानव आकृती असाव्यात.
  • चित्र पेपर ला शोभेल असे असावे ( खूप लहान किंवा खूप मोठे असू नये.)
  • चित्रात जवळची मानवाकृती ( अथवा इतर कोणतेही आकार ) मोठी व जशी जशी  दूर जाईल तशी लहान दिसेल.
  • चित्रात सर्व मानवाकृती एकसारख्या व एकारेषेत काढू नये.
  • मानावाकृतीत वेग-वेगळ्या हालचाली असाव्यात.
  • चित्राची रचना ( मांडणी ) चांगली असावी.
  • चित्रात आकृत्या एकमेकास आच्छादित असाव्यात.

रंगकाम करताना 

  • खडूचे ( पेस्टल ) रंग वापरताना काळ्या स्केचपेन ने OUTLINE करावी. व नंतर रंगकाम करावे.
  • जलरंगाने ( WATER COLOUR ) रंग काम करताना रंगकाम पूर्ण झाल्या नंतर  काळ्या स्केचपेन ने अथवा ब्रशने OUTLINE करावी.
व्हिडीओ साठी क्लिक करा.👇
 
व्हिडीओ- 1

 

व्हिडीओ- 2

नमुना चित्र 👇

memory-drawing-rain
स्मरण चित्र-१
memory-drawing-rain
स्मरण चित्र-२