इयत्ता: सहावी ते आठवी
लॉकडाऊन काळात शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय शिक्षकांसमोर खुला झाला. ऑनलाईन शिक्षण फक्त पाठ्यपुस्तक शिकवण्यापुरतेच मर्यादित न ठेवता त्यांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट साध्य होणे गरजेचे आहे. ऑनलाईन शिक्षणाला सहशालेय उपक्रमांची जोड देत विद्यार्थी कृतियुक्त शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.
आपल्याकडे मोबाईल, लॅपटॉप, अशी उपकरणे वापरुन आपण अनेक गोष्टी करतो. पण या माध्यमांचा वापर करुन शाळा किंवा कोणत्याही प्रकारचे शैक्ष णिक उपक्रम चालवणे हे आपल्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. विद्यार्थी अध्यापनाच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त क्रीयामग्न व्हावा तसेच ज्ञाननिर्माता व्हावा यासाठी कार्यानुभव शिक्षकांकडून उपक्रम राबविले जातात. अशा उपक्रमा पैकी राखी तयार करणे हा उपक्रम इयत्ता ६वी ते ८वि च्या विद्यार्थ्यांकरता. उपलब्ध असलेल्या साहित्यांचा वापर करुन राखी तयार करावयाची आहे.
विषयानुसार राखी तयार करण्यासाठी VIDEO LINKS 👇
मोती मणी पासून राखी
धाग्यांपासून राखी
पेपरपासून राखी
सॅटीन रिबीन पासून राखी