विद्यार्थी मित्रांनो,  

आज आपण निसर्ग चित्र या विषयाअंतर्गत ब्रशच्या फटकाऱ्यातून विविध प्रकारचे फुले व पाने यांचे आकार कसे तयार करता येतात ते बघु.

टीप: सदर प्रात्याक्षिक हे जलरंगात आहे. जलरंग (वाटर कलर) हाताळणे हे कौशल्याचे काम आहे. सतत सरावातुन ते साध्य करू शकता.

कृतीः

  • दिलेला व्हिडीओत प्रथम ब्रशमध्ये फक्त पाणी  घेऊन फुलाच्या आकारानुसार पाकळ्यांचे आकार काढले. 
  • नंतर लाल रंगाच्या फुलांसाठी ब्रशमध्ये लाल किंवा गुलाबी रंग ( किंवा शेड्स ) घेऊन रंगाचे थेंब पाण्याने तयार केलेल्या आकारात सोडले. 
  • व्हिडीओत दाखविलाप्रमाणे रंगसंयोजनानुसार पिवळ्या रंगाचे शेड्स घेऊन पिवळ्या रंगाचे थेंब सोडलेत.
  • वरील कृतीप्रमाणेच पानांच्या आकारासाठी पाण्याने आकार तयार करून हिरव्या – निळ्या रंगाचे शेड्स वापरून पाने तयार करा.
  • जलरंग कौशल्याने हाताळल्या नंतर मिळणारा इफेक्ट खुप सुंदर असतो व चित्रात जिवंतपणा येतो. 
  • या पद्धतीचा वापर करून आपण विविधा ग्रीटींग कार्डस् तयार करू शकतो.
निसर्ग-चित्र-Nature-Drawing
निसर्ग चित्र – प्रात्यक्षिक
निसर्ग-चित्र-Nature-Drawing
निसर्ग चित्र – प्रात्यक्षिक

निसर्ग-चित्र-Nature-Drawing
निसर्ग चित्र- ग्रीटिंग
निसर्ग-चित्र-Nature-Drawing
निसर्ग चित्र- ग्रीटिंग

खाली दिलेला व्हिडीओचे व्यवस्थीत निरीक्षण करून बघा .👇