SUBJECT – MEMORY DRAWING 

6th CLASS 

स्मरण-चित्र

एखाद्या प्रसंगाचे चित्रण म्हणजे स्मरण चित्र

एखाद्या प्रसंगाचे  चित्रण करत असताना त्या प्रसंगाच्या आठवणींना आपण उजाळा देतो. प्रसंगादरम्यान काही गोष्टी  आपल्या मनावर दीर्घकाळ  टिकून राहतात.अशा प्रसंगाचे वर्णन आपल्या चित्रातून आपण करत असतो. हे चित्रण करत असताना चित्र कलात्मक दृष्ट्या सौंदर्यपूर्ण व  मनाला आनंद देणारे असेल यास स्मरण चित्र असे म्हणता येईल.

स्मरण चित्र तयार करत असताना खाली काही गोष्टी लक्षात असू द्या …..

  • चित्र तयार करत असताना चित्राच्या विषयाला प्राधान्य द्या
  • चित्रात किमान तीन ते चार मानव आकृती असाव्यात.
  • चित्र पेपर ला शोभेल असे असावे ( खूप लहान किंवा खूप मोठे असू नये.)
  • चित्रात जवळची मानवाकृती ( अथवा इतर कोणतेही आकार ) मोठी व जशी जशी  दूर जाईल तशी लहान दिसेल.
  • चित्रात सर्व मानवाकृती एकसारख्या व एकारेषेत काढू नये.
  • मानावाकृतीत वेग-वेगळ्या हालचाली असाव्यात.
  • चित्राची रचना ( मांडणी ) चांगली असावी.
  • चित्रात आकृत्या एकमेकास आच्छादित असाव्यात.

रंगकाम करताना 

  • खडूचे ( पेस्टल ) रंग वापरताना काळ्या स्केचपेन ने OUTLINE करावी. व नंतर रंगकाम करावे.
  • जलरंगाने ( WATER COLOUR ) रंग काम करताना रंगकाम पूर्ण झाल्या नंतर  काळ्या स्केचपेन ने अथवा ब्रशने OUTLINE करावी.

विद्यार्थी मित्रांनो,

आज आपण ‘माझा आवडता खेळ’ ह्या विषयाचे स्मरण चित्र कसे तयार करता येईल याचे प्रात्यक्षिक बघणार आहोत.

👇 CLICK HERE FOR VIDEO 👇

नमुना चित्र
स्मरण चित्र
स्मरण चित्र