रंगांची माहिती
विद्यार्थी मित्रांनो,
आज आपण रागांविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. निसर्गाकडून आपल्याला लाल, पिवळा व निळा हे तीन रंग मिळाले आहेत या रंगांना प्राथमिक रंग असे म्हणतात.हे रंग कोणत्याही रंग मिश्रणाने तयार करता येत नाही म्हणून यांना मूळ रंग असेही म्हणतात.
दोन मूळ रंग एकत्र केल्याने तयार होणारा रंग हे दुय्यम रंग असतात किंवा यांना द्वितीय श्रेणीचे रंग असे म्हणतात.
- लाल आणि पिवळा रंग मिश्रणाने तयार होणारा रंग नारंगी रंग असतो. तसेच
- लाल व निळा रंग एकत्र केल्याने जांभळा रंग तयार होतो. आणि
- नीला व पिवळा रंग एकत्र करून हिरवा रंग तयार करता येतो.
- अशा पद्धतीने आपले रंगचक्र पूर्ण होते.
- नारंगी, हिरवा व जांभळा रंग दुय्यम रंग किंवा द्वितीय श्रेणीचे रंग आहेत.
👇 खाली दिलेला व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. 👇
प्रथम श्रेणीचे रंग, द्वितीय श्रेणीचे रंग तसेच, काही रंगसंगती विषयी जाणून खाली दिलेला व्हिडीओ लक्षपूर्वक बघा आणि ऐका. 👇